चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) खामगाव-जालना बायपास वरील पुंडलिकनगर कमानि जवळ दोन वाहनाचा भीषण अपघात झाला. या अपघातात पृथ्वीराज अजय सुरडकर (वय 19, रा. सोमठाणा) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून ओम प्रकाश इंगळे हा गंभीर जखमी झाला आहे.अपघात इतका जोरदार होता की पृथ्वीराजला गंभीर दुखापत झाली. त्याला तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. ओम प्रकाश इंगळे यालाही गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर जवंजाळ हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.