Oplus_131072

अंढेरा (बुलडाणा कव्हरेज न्युज): देऊळगाव राजा तालुक्यातील अंढेरा पोलिस स्टेशन पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. अंत्री खेडेकर येथील सामाजिक कार्यकर्ते कार्तिक खेडेकर आणि विठ्ठल खेडेकर यांनी काही दिवसांपूर्वी बुलडाणा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांच्याकडे एक निवेदन सादर केले. या निवेदनात अंढेरा पोलीस ठाण्यातील बीट जमदार सिद्धार्थ सोनकांबळे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती.खेडेकर बंधूंचा आरोप आहे की, सोनकांबळे यांच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे सुरू असून, पोलीस दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे या बीट जमदाराला तत्काळ बडतर्फ करावे किंवा त्यांची बदली करावी, अशी स्पष्ट मागणी त्यांनी केली आहे.या प्रकरणामुळे आता परिसरात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. खरंच सोनकांबळे यांच्या हद्दीतच अवैध धंदे सुरू आहेत का? मग इतर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत असे प्रकार घडत नाहीत का? खेडेकर बंधू फक्त सोनकांबळे यांच्या मागेच का लागले आहेत? यामागे कोणतेही राजकीय अथवा वैयक्तिक कारण आहे का?ही स्थिती पाहता नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. खेडेकर बंधूंनी यापूर्वी देखील काही ठिकाणी सामाजिक प्रश्न उपस्थित केले आहेत, परंतु आता ते चिखली व अन्य भागातील अवैध धंद्यांकडेही लक्ष देतील का? हा एक महत्वाचा प्रश्न आहे.या संपूर्ण प्रकरणाकडे पोलीस प्रशासन काय भूमिका घेते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Join WhatsApp Group!