चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) तालुक्यातील सोमठाणा येथे दोन दिवसांपूर्वी एका विहिरीत दिव्यांग तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती. या प्रकरणात आत्महत्या की खून, याबाबत संशय होता. मात्र पोलीस तपासात ही आत्महत्या नसून थेट खूनच असल्याचे निष्पन्न झाले आहे.वैभव पांडुरंग वाघमारे (वय २८) असे मृत तरुणाचे नाव आहे. २३ एप्रिल रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास तो गावातील एका आरोपीच्या घरी बसलेला होता. त्यावेळी आरोपीने वैभव आपल्या पत्नीशी बोलतो, वागणूकही विचित्र आहे, अशा संशयावरून रागाच्या भरात वैभववर हल्ला केला. या हल्ल्यात वैभवचा मृत्यू झाला. नंतर त्याचा मृतदेह विहिरीत फेकून देण्यात आला.या प्रकरणात वैभवचा भाऊ प्रसाद पांडुरंग वाघमारे (वय २६) याने पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार संबंधित महिलेच्या पतीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Join WhatsApp Group!