भरोसा ( अंकुश पाटील-बुलढाणा कव्हरेज न्यूज) – गावात तीव्र पाणीटंचाईमुळे ग्रामपंचायतीच्या निष्क्रियतेविरोधात असोला बु येथील महिलांनी आज, २५ एप्रिल रोजी ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा काढला.गावात मागील महिनाभरात नळाला पाणी आलेले नाही. महिलांना दररोज १-२ किलोमीटर अंतरावरून डोक्यावर हंडा घेऊन पाणी आणावे लागत आहे. शासनाने मंजूर केलेल्या तलाव आधारित नळयोजनेवरही अद्याप पाणी मिळत नसल्यामुळे महिलांचा संताप उसळला.“वेळेवर करपट्टी, नळपट्टी भरतो, मग पाणी का नाही?” असा सवाल महिलांनी केला. त्यांनी तातडीने टॅंकरची सोय, नळदुरुस्ती आणि नियमित पाणीपुरवठ्याची मागणी केली असून, अन्यथा आमरण उपोषणाचा इशाराही दिला आहे.गावकऱ्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, जर लवकरच पाण्याचा प्रश्न सुटला नाही, तर ग्रामपंचायत कार्यालयासमोरच आमरण उपोषण सुरू केले जाईल.गावकऱ्यांची मागणी आहे की, गावासाठी तातडीने टॅंकरची व्यवस्था करावी, नळदुरुस्ती तात्काळ व्हावी आणि पाणीपुरवठा नियमित करण्यात यावा. अन्यथा आणखी मोठा आंदोलन छेडण्यात येईल, असा निर्धार महिलांनी विमल जगन गवई, नंदा साहेबराव मस्के, आशा रमेश गवई, लिलाबाई भिकाजी गवई, सुलोचना मधुकर गवई, कमल दिनकर मस्के, सुरेखा संतोष गवई, कविता प्रकाश पवार, इंदुबाई लहू चव्हाण, शांताबाई मधुकर चव्हाण, गंगुबाई उकिरडा राठोड, गणेश छोटू चव्हाण, विकास गुलाबराव राठोड, अनिल देवसिंग राठोड, नंदू विठ्ठल राठोड, रमेश रावजी राठोड, उमेश उत्तम चव्हाण, पंढरी भिकाजी आडे यांनी व्यक्त केला आहे.